"गारबेज एंझाईम"
साहित्य :-
प्लास्टिक बरणी हवाबंद असलेली
१०लिटर पाणी
१किलो काळा गुळ
३ किलो गोड फळे
कृती :-
सुरवातीला ड्रम घेणे.पूर्ण साफ करून.त्यामध्ये पाणी टाकावे.
फळे व भाजीपाला त्यात टाका. नंतर गुळ बारीक करुन पुर्ण मिश्रण करून घ्यावा.तसेच फळे पूर्ण त्या ड्रम मध्ये टाकावे. झाकण लावून सावलीत ठेवा. दर ५ दिवसांनी ढवळावे. रोज ४ मिनिटे उघडे ठेवा.नंतर बंद करा.फक्त एकदाच करावेत.
९० दिवसांनी हे तयार होते.
९० दिवसांनी याला गाळून घ्यावे. त्याच्यातला चौथा निघालेला शेतात टाकावा. गाळलेले गारबेज एंझाईम सावळीत ठेवावे. एकदम सुखरूप जागेत.
संपेपर्यंत वापरू शकतात. ( Expiry - 12 years )
याच्यात सर्वप्रकारची फळे भाज्या जी उपलब्ध असतील ती वापरु शकतात. लसुण, मिरच्या, कडुलिंबपाला, लिंबोळया, विविध वनस्पति, गव्हांकुर ई चा वापर करावा.सप्त धान्य सुद्धा वापर करू शकता.औषधी वनस्पती सुद्धा वापर करू शकता.
प्रमाण :-
१ लि.पाणी - ६~९मीली एंझाईम
१५ लि पाणी - ६० ते ९० मीली गारबेज एंझाईम फवारणीसाठी.
५ लि गारबेज एंझाईम - २०० लि. पाणी ड्रिचींगसाठी.
१ लि पाणी - १५० मिली गारबेज एंझाईम बियाणे प्रक्रियासाठी.
मिलीबगसाठी
गारबेज एंझाईम १.५ ते २ लिटर - २०० लिटर पाणी टाकून फवारणी करावी.
सर्वप्रकारच्या पिकांवर फवारणी व जमीनीवर ड्रिचींग करावी.
गारबेज एंझाईम हे संजीवक, बुरशीनाशक, किटनाशक म्हणून काम करते.
विविध अमिनो आम्ले, पोषक द्रव्य, अन्नद्रव्य असतात.
पिकात प्रतिकार क्षमता वाढवते.
गारबेज पिकात प्रतिकारक्षमता निर्माण करते,
जमिनीत दिल्यास त्यातील साखर जिवाणू घेवुन जास्त कार्यक्षम पणे पिकाला हवे ते घटक उपलब्ध करुन देता येते.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161