Ad Code

Responsive Advertisement

शेततळे बांधताना कोणत्या बाबी महत्वाच्या आहे जाणून घेऊ.तसेच शेतीला शेततळे खूप महत्वाचे आहे.


शेततळे बांधताना सांभाळा तांत्रिक बाजू
शेततळे निर्मितीसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. 
    शेतात शेततळे करताना घ्यावयाची काळजी  : 
१) शेततळ्यासाठी जागा निवडताना कठीण, मुरूम, खडक, जिवंत पाण्याचे झरे लागणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरिता जमीन निवडताना नमुना खड्डा (ट्रायल पीट) घेऊन तळ्याची जागा निश्चित करावी. 
२) शेततळ्याचे क्षेत्रफळ साठवणूक क्षमतेप्रमाणे निश्चित करावे. जमिनीचे कमीत कमी क्षेत्रफळ व्यापले जाईल अशापद्धतीने शेततळे घ्यावे. पाण्याचा पसारा कमी ठेवल्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी होण्यास त्याचा फायद होतो. 
३) शेततळ्याच्या खोदाईचे काम करतानाच तळ्यांच्या बाजूचा उतार योग्य ठेवावा. बाजूच्या भिंती सपाट व गुळगळीत करून घ्याव्यात. शेततळ्यातील टोकदार दगड, धारदार वस्तू, काचा, झाडांच्या मुळ्या इ. काढून टाकावेत. अस्तरीकरणाच्या दृष्टीने ही सर्व पूर्व तयारी उपयोगी पडते. 
४) शेततळ्याचे काम प्रथम खोदाई नंतर कुंपण घालणे आणि त्यानंतर प्लॅस्टिक अस्तरीकरण अशा क्रमाने पूर्ण करावे. खोदाई करून काढलेली माती शेततळ्याच्या आकारानुसार दाबून लावून बांध बनवावा. 
५)शेततळ्याचे तिन्ही टप्प्यांतील काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पूर्ण देखरेख करावी. शेततळ्याच्या बाजूच्या परिसरात झाडे-झुडपे, गवत, काडीकचरा वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. घुशी, उंदीर, खेकडे इत्यादींपासून शेततळ्याचे त्यामुळे संरक्षण होते. 
६)पावसाबरोबर वाहून येणाऱ्या पाण्यातील गाळ शेततळ्यात जाऊ नये म्हणून गाळण यंत्रणा बसवावी. गाळण यंत्रणा तयार करण्यासाठी २x२x२ मी. आकाराचा खड्डा करून त्यामधून पाणी वाहून जाण्याची सोय करावी. पाण्यातील गाळ त्या खड्ड्यामध्ये बसून राहतो व गाळणी केलेले पाणी शेततळ्यामध्ये जाते. अस्तरीकरण केलेल्या प्लॅस्टिक शीटवर त्यामुळे गाळ साठत नाही. 
७) गाळण यंत्रणेमध्ये वरील थरात ५० ते १०० मि.मी. जाडीची खडी, मधल्या थरात ५ ते १० मि.मी. जाडीची बारीक खडी आणि सर्वांत खालील थरात २ ते ४ मि.मी. जाडीची वाळू वापरावी. 
पाणी आत बाहेर होणाऱ्या मार्गाची रचन :

• शेततळ्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या पाण्यासाठी इनलेट व आऊटलेट मार्गाची रचना करावी. ज्या ठिकाणी शेततळे घेतलेले आहे तेथून ओघळीपर्यंत साधारण १० मी. लांबीचा व १.५ ते २ मीटर रुंदीचा इनलेट चर तयार करावा. चराची खोली ०.५० मी. पर्यंत घ्यावी व त्यास दोन टक्क्यांपेक्षा कमी उतार द्यावा. चराला २० ते २५ सें.मी. जाडीचे दगडाचे आच्छादन करावे. ओघळीचे पाणी इनलेटमध्ये घेण्यासाठी ओघळीमध्ये छोटीशी जुजबी रचना करावी. सिमेंटच्या मोकळ्या गोण्यांमध्ये वाळू भरून त्या ओघळीत आडव्या टाकल्यानेही ओघळीचा प्रवाह शेततळ्याकडे वळविता येतो. 
• शेततळे पाण्याने पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओघळीमध्ये सुरक्षितपणे सोडण्यासाठी आउटलेट तयार करावे. इनलेटप्रमाणेच आऊटलेटचेही काम करावे. तसेच आऊटलेटमधून बाहेर जाणारे पाणी शेतीसाठी गरजेनुसार वापरण्यासाठी पाट करून घ्यावा. आऊटलेटची लांबी शेततळ्यापासून ओघळीपर्यंत साधारणपणे १० मीटर ठेवावी. आऊटलेटचे खोदकाम करताना त्याला जमिनीच्या प्रकारानुसार १.५ः१ किंवा २ः१ असा बाजूने उतार द्यावा. 

 शेततळ्यासाठी अस्तर : 
१) पाणी धरून ठेवण्याची अत्यंत कमी क्षमता, तसेच पाणी पाझरण्याचा वेग प्रचंड असलेल्या जमिनीतील शेततळे पावसाळ्यात पूर्ण भरले तरी काही दिवसांत कोरडे होते. अपेक्षित फायदा अशा शेततळ्यातून होत नाही. शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी त्याला अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. 
२) अस्तरासाठी बेन्टेनाईट, माती व सिमेंट मिश्रण, चिकणमाती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. सिमेंट व मातीचे प्रमाण १ः८ व जाडी ५ सें.मी. इतकी ठेवतात. प्लॅस्टिक फिल्म वापरताना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी. उन्हाचा किंवा अतिनील किरणांचा त्यावर विपरीत परिणाम होत नाही. 
३) प्लॅस्टिकचे कापड शेततळ्यात पसरविताना मुरमाची किंवा मातीची अणकुचीदार टोके वर येऊ नयेत याची काळजी घ्यावी. सुक्या मातीचे किंवा वाळूचे थर अशा टोकांवर पसरून त्यावर प्लॅस्टिकचे कापड घड्या पडणार नाही या पद्धतीने टाकावे. 
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या