"गांडुळ बेड कसे तयार करावे.तसेच योग्य रित्या वापर कसा करायचा."
खुप माझ्या शेतकरी मित्रांनी गांडुळ बेड व गांडुळ कल्चर माझे कडुन घेतले आहे.त्यांचा खूप खूप धन्यवाद.
सुरवातीला जागेला 1' फुटाचा उतार द्या आणि शेड सावली करावी .पाण्याची व्यवस्था करावी. मुंगुस रानडुकरे कोंबड्या येणार नाही काळजी घ्यावी.खूपच गरजेचे आहे.कारण हे सर्वात जास्त नुकसान करतात.
बेड कसा उभा करावा.
पाईप चे 2/3 फुटाचे 10 तुकडे बेड अंथरुन पाॅकेट मध्ये खोचुन बेड उभा करावा. उताराचे ठिकाणी तळाला जाळी आहे .तेथे पाईप बसवुन किंवा खाली 2 फूट गड्डा करून गांडूळ पाणी जमा करावे. बाहेर काढावा खड्डा करून कॅन ठेवावा
पहिला थर मका कुट्टी,काडी कचरा ,पाला पाचोळा, गवताचे कुटार चा 6"उंचीचा थर ओला करुन पसरावा.नंतर 200 लिटर पाणी मध्ये 1 किलो गूळ टाकून पूर्ण थर ओला करावा.
दुसरा थर 6"चा कुजलेले शेणखताचा पसरावा .नंतर थर 5-6दिवस ओला करावा. थंड झाल्यावर गांडुळ कल्चर 10 किलो सोडावेत . सर्व दुर सोडावे वर शेणखताचा थर द्यावा .नंतर 5 दिवसानी गोणपाट ओले करून अंथरावे.किंवा सुतळी पोते झाकून द्यावे.
पावसाळा/हिवाळ्यात आठवड्यातून 2 वेळा 30लिटर पाणी शिंपडावे
उन्हाळ्यात 1दिवसा नंतर 30 लिटर पाणी शिंपडावे. 55-60 दिवसानंतर उत्तम प्रकारचे गांडूळ खत तयार झाले दिसतील.
व्हर्मी वाॅश -
तळाला कॅन ठेवल्यास उत्तम वर्मी वाॅश जमा होईल . ह्यात ह्युमिक, अमिनो असिड, संजिवके असतात . पंपास 1लिटर
ठिबक मधुन 15/20 लिटर एकरी सोडावे
गांडुळ खत -
55-60 दिवसात तयार होईल.गाळणीने गाळून गांडुळ वेगळे करुन गांडूळ खत जमा करावेत. दुसरा बेड ह्या प्रमाणे तयार करून घ्यावा.त्या वर गांडुळे सोडावे .
वापर :-
फळझाडासाठी 3 किलो .
भाजी पाला पिके साठी एकरी 10 क्विंटल .
खरीप/रबी पिंकासाठी एकरी 500 किलो पेरणी आधी वापर करावा .
ज्या शेतकरया ना गांडुळ बेड व गांडुळ कल्चर पाहिजे असल्यास 9529600161 फोन वर मागणी करावी घरपोच पाठविणे ची व्यवस्था केली जाईल.गांडूळ खत सुद्धा उपलब्ध आहे.तसेच प्रशिक्षण सुद्धा दिले जातील.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161