Ad Code

Responsive Advertisement

तुर पीक व्यवस्थापन महिती, नियोजन अगदी कमी खर्चात पूर्णतः जैविक पद्धतीने .

तुर पीक व्यवस्थापन महिती, नियोजन अगदी कमी खर्चात पूर्णतः जैविक पद्धतीने . 🌱🌾🎋🌱


        तूर पिकास सर्व प्रथम गांडूळ खत द्यावे.बीजप्रक्रिया करावी.नंतर मांडणी नुसार अंतर ठेवून पेरणी हाताने करावी.नंतर जमिनीमध्ये डी कंपोजर द्रिंचिग करून घ्यावेत.आपण सुद्धा जैविक निविष्ठांचा आपण सहजा उपयोग करू शकतो. डी कंपोजर ,सोबत तांदूळ पेज, अंडा संजीवक द्रिंचीग करणे खूप आवश्यक आहे.तसेच बुरशी वाढली असेल तर Trichoderma किंवा बायोमिक्स द्रींचिंग महत्वाची ठरते. तसेच फवारणीसाठी तूर पिकाला उत्तम पर्याय बायोमिक्स, तरल खत, गांडूळ पाणी किंवा अंडा संजीवक फवारणी करणे गरजेचे आहे.तसेच पिकांना सेंद्रिय कर्ब वाढविणे महत्वाचे आहे.तूर पीक 30 दिवसांचे झाले नंतर पहिली कटिंग करून घेणे.नंतर बुरशीनाशक फवारणी करावी.तसेच दुसरी कटिंग 20 दिवसांनी करावी नंतर पुन्हा बुरशीनाशक फवारणी करावी.तसेच जमिनी मधून दोनदा गांडूळ पाणी, डी कंपोजर, micro newton द्यावेत.तसेच गांडूळ खत द्यावे.🪱🪱🪱🪱
        कळी अवस्था मध्ये आपण फक्त कीटक नियंत्रण करावेत. निम अर्क, निंबोळी तैल, दशपर्णी अर्क, बाजरी पासून बनविलेले कीटकनाशक, हिगंणास्त्र यांची फवारणी करणे गरजेचे असते.सोबतच गोमूत्र, हिंग , तुरटी, ताक वापर केला तरी चलते.चिकट सापळे पिवळे निळे लावावेत.तसेच लाईट ट्रॅप पतंग नियंत्रण करण्यासाठी लावावेत.🐝🐝🐝🐝🐝
        फुलोरा अवस्थामध्ये आपण फवारणी नक्की करायला पाहिजे.पण उगवण फुलांची १०% तरी नक्की होवू द्या.नंतर फवारणी करा.म्हणजे सूर्यप्रकाश नियोजन सोबत औषध सुद्धा निदान समजते.थोडे दिवस तूर पीक ताणवर सोडणे आहे.जास्त दिवस ताण पडल्यास ओलावा देणे.नंतर आपण नियोजन करावेत. फवारणी साठी micro newtron फवारणी करावी.नाहीतर अंडा संजीवक,मासोळी तैल ,पळस फुले , ताक , नारळ पाणी वापर करावा.तूर पिकावरील किडी जास्त येत असतात.त्यासाठी चिकट सापळे, लाईट ट्रॅप, फेरोमन ट्रॅप, पक्षी थांबे, लावणे आहे.तूर पिकावर सुरवातीस पाने खाणारी अळी, पाने गुडाळणारी अळी,पतंग केसाळ, शेंगमाशी, शेंगा पोखरणारी अळी, येत असतात. यासाठी सुरुवात पासूनच चिकट सापळे, लाईट ट्रॅप, फेरोमन ट्रॅप लावा.म्हणजे नार मादी पतंग नियंत्रण होतील.त्यांचे प्रजनन थांबवता येणार.अंडी घालणार नाहीत.🐛
        कीटक नियंत्रण साठी निम अर्क ,निम ऑईल ,दशपर्णी अर्क, तरल खत,फवारणी करावी.या सोबत गोमूत्र ,ताक वापर करावा. हिंगणास्त्र अळी नाशक फवारणी करावी.शेतात सुरुवातीपासूनच लाकडी काठीवर चिकट सापळे पिकापासून १फूट उंचीवर लावणे.त्यावरच पक्षी थांबे तयार करावेत.पक्ष्यांना खाण्यासाठी बाजरी,तांदूळ ,पोळी द्यावे.म्हणजे त्यांना खाण्यासाठी अन्न साठी भटकंती करावी लागणार नाही.तसेच त्यांना अळी, पतंग दिसतच ते सुद्धा वेचून खातील. कृपया करून रासायनिक फवारणी करू नयेत.नाहीतर पक्षी मरतील.मग पक्षी थांबे लाऊन फायदा नाही होणार.🦅🕊️🦢🦩🦤🕊️🦩🕊️
        मर रोग वांझ रोग दिसतच झाड नष्ट करावी.किंवा उपयोजना कराव्यात. मेटारायझम फवारणी किवा द्रिंचींव करावी.रस शोषून घेणारे कीटक दिसतील तर व्हर्टीसिलियम लेकनी वापर करावा.शेतातील मित्र कीटक संगोपन लेडी बिटल, क्रायसोपर्ली आपले पिकाचे संगोपन करतील.शत्रू कीटक खातील.✔️✔️✔️
        ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकाला नुकसान होते उत्पन्न घट होते..दाट💨 धुके पडत असल्याने कोवळे🌻 फुले गळण होते.व्हायरस तयार होत असते.अळी 🐛जास्त प्रमाणात नुकसान करते.कळी तुटून पडत असते.पिकांना जास्त अन्नाची गरज भासत असते.जमिनीला जास्त प्रमाणात अन्न उपलब्ध होत नाही. त्यामुळे पीक काही रोग ग्रस्त होत आहे तर कुठे पिकांना फळ गळ जास्त प्रमाणात सुरू असते .तसेच जमिनीला भेगा पडत💫 असल्याने पाणी देणे अती महत्वाचे आहे.तसेच पिकांना जमिनीमधून गांडूळ खत, हिरवे निळे शेवाळ, देणे अत्यंत गरजेचे आहे.शेतात रासायनिक खते आणि रासायनिक फवारणी न केल्याने पक्षी वाढ सुद्धा होतील.पुन्हा पक्षी आपल्या पुढच्या पिढीला दिसणार.संगोपन होते.मादी फुलांची संख्या वाढविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक मधमाशी.🐝🐝🐝.या साठी काळा गूळ फवारणी करावी.पाणी व्यवस्थापन बरोबर करावेत.धूर करू नये. मधमाशी फुलांचे मादी रूपांतर करतील.मध गोळा करतील. मेण आणि पराग कण जमा करतील.
        तूर पिवळे पडत असल्यास, वाळत असल्यास Trichoderma बुरशीनाशक आळवणी करावी.सोबत बायोमिक्स वापर करावा.दाणे भरण्याच्या वेळेस पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहेत.🌱🌾🌱🍀🎋

पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या