Ad Code

Responsive Advertisement

चिकट सापळे महत्व आणि फायदे.सर्वात जास्त कीटक नियंत्रणसाठी चिकट सापळे नक्की वापर करा.

शेतीमध्ये  पिवळे निळे पांढरे चिकट सापळे वापर करतात. तर त्याचे  महत्व आणि फायदे जाणून घेऊया .


पिवळे सापळे - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पतंग वर्गीय कीड,इतर कीटक, हिरवे कीटक, आणि रस शोषण करणारी कीड.

निळे सापळे - फुलकिडे आणि नागअळी,इतर किडी.

पांढरे सापळे - मिरची वरील काळा थ्रीप्स व भाजीपाला पिकावरील  थ्रीप्स
सापळे वापराचे फायदे
१. रस शोषणाऱ्या किडी आणि त्यांच्यापासून प्रसारित होणाऱ्या रोगांसाठी अत्यंत उपयोगी आहेत. 
२. टोमॅटो, मिरची, वांगी सर्व रस शोषणाऱ्या किडी आणि त्यापासून प्रसारित होणा-या रोगापासून संरक्षण करते. कोबी, फ्लॉवर रस शोषणाऱ्या किडी आणि पतंगवर्गीय किडींपासून संरक्षण, काकडी, कारले (वेलवर्गीय पिके) - रस शोषणाऱ्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण लवकर मिळवते.
३. आंबा, पेरू, केळी (फळवर्गीय पिके) रस शोषणाऱ्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण मिळवून देते.
 ४. कांदा, बटाटा, लसूण (कंद वर्गीय पिके) रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण दिल्याने फवारणी खर्च वाचतो.
सापळे चा वापर कसा करावा.
१. चिकट सापळे चे पाकीट कापावे.
२. चिकट भागाला हात लावण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावे.
३. सापळे एकमेकांपासून वेगळे करावेत.
४. भाजीपाला पिकांमध्ये रोपाच्या उंचीच्या एक पट उंचीची काठी घेऊन त्याला सापळा लावावा. सापळयाची उंची हि पिकाच्या उंची पेक्षा १ फुट उंच ठेवावी.
५. फळपिकांमध्ये सापळे हे झाडाच्या मध्यभागी लावावेत.झाडाला बांधून ठेवावेत.
६. सापळे शक्यतो पूर्व-पश्चिम जास्त उजेड पडून चमकतील असे लावावेत. म्हणजे रात्रीला ते चमकत राहील.
 चिकट सापळे  का वापरावे..
१. निसर्गातील ब-याच हानिकारक किडी निळ्या , पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाकडे आकर्षित होतात. हे एक नैसर्गिक किड नियंत्रणाचे उपयुक्त साधन आहे.
२. पूर्णतः बिनविषारी असून चिकटपणा बराच काळ टिकून राहतो.
३. पर्यावरणास अनुकूल आणि वापरास अत्यंत सोपे आहे.
४. किड नियंत्रणासाठी सर्वच ऋतुंमध्ये उपयुक्त असून पावसातही चिकटपणा टिकून राहतो.
जास्त फायदा मिळण्यासाठी काय करावेत. 
१. सापळे पिकाच्या लागवडीनंतर लगेच पहिल्या आठवड्यात लावावेत.
२. चांगल्या परिणामासाठीफ एकरी २५ ते ३० सापळे वापरावेत.
३. सापळे ९० टक्के किटकांनी किंवा धुळीने भरल्यास त्वरित बदलावेत. वापर जेवढा जास्त कराल तेवढा फवारणी खर्च कमी होतील. मजुरी बचत होणार. पीक विषमुक्त होतील.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.9529600161.
एकदम स्वस्त दरात चिकट सापळे विक्री सुरू आहे. तसेच होलसेल दरात विक्री सुरू आहे.
पांढरे चिकट सापळे 25 नग 150/-₹ बॉक्स
निळे चिकट सापळे 25 नग 150/-₹ बॉक्स
पिवळे चिकट सापळे 25 नग 150/-₹ बॉक्स
घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध आहे.आजच संपर्क करा.
पिवळे निळे चिकट सापळे रस शोषण करण्याऱ्या कीटक नियंत्रणसाठी उपलब्ध आहे.हे चिकट सापळे पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, हिरवे कीटक,थ्रीप्स ,पिवळा काळा मावा,रस शोषण किडी,पाकोळी व पतंगवर्गीय , भुंगेरेवर्गीय कीड नियंत्रण करतात.

पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या