निंबोळी अर्काचा शत्रू किडीवर होणारा घातक परिणाम👍🙏
१) भक्षणरोधक : पानांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात. किडी अशी पाने खाणे टाळतात. किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या मरतात.
२) अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा : कडू वासामुळे पिकांच्या पानांवर, फुलांवर कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही. त्यामुळे पुढील पिढी तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
३) प्रजोत्पादन प्रक्रियेत अडथळा येणे : निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे किडीमध्ये नपुंसकता येते. नरमादीमध्ये लिंगाकर्षण कमी होते. परिणाम: पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
४) पिकापासून परावृत्त करणे : निंबोळी अर्काच्या कडू वासामुळे कीड पिकाजवळ येत नाही.
५) किडीच्या कात टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येणे : किडीची नैसर्गिक वाढ होताना अळी अगर पिल्लू अवस्थेत शरीर वाढीसाठी नियमित कात टाकणे आवश्यक असते. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे त्यात व्यत्यय येतो.
६) अविकसित प्रौढ तयार होणे : कोषावस्थेतून निघालेल्या प्रौढ किडीमध्ये विकृती, अपंगत्व येणे, अविकसित पंख तयार होतात. त्याचबरोबर प्रजोत्पादन क्षमता मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.
७) जीवनकालावधी कमी होणे : निंबोळी अर्काच्या संपर्कात आलेल्या किडीच्या विविध अवस्थांवर घातक परिणाम होऊन त्यांचा जीवनकालावधी कमी होतो.
निंबोळी अर्क वापरल्याने शेतातील पिकांना होणारे फायदे :
१. निर्मिती खर्च अत्यल्प असतो.
२. नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही.
३. निंबोळी अर्क बनवणे, हाताळणे व वापरणे सोपे आहे.
४. घातक किडींना प्रतिबंध, नियंत्रण करत असले तरी नैसर्गिक शत्रू, मित्रकीटकांसाठी फारसे हानिकारक ठरत नाही.
५. रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
६. निंबोळी अर्क/पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सूत्रकृमी, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात.
७.– निंबोळी अर्क पिकावर फवारणी साठी वापरला असता पांढरी माशी मिलीबग लष्करी अळी तुडतुडे फुलकिडे कोळी इत्यादी प्रकारच्या किडींना खाद्य प्रतिबंध करतो कडुनिंबतील आझाडिरेक्टईन हा घटक किडींची वाढ थांबवतो तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते.
**जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161**
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🐛🐛 *शेतकरी मित्रहो मार्केट मध्ये येणाऱ्या भेसळ निम अर्क निम ऑईल कडे लक्ष द्या.ज्या निम अर्क किंवा निम ऑईल मध्ये लिहून असेल की आझाडिरेक्टईन आणि निमोनाईड घटक आहे.तेच वापर करा. 💯 भेसळ निम अर्क निम ऑईल वापर केल्याने सर्वच पिकांना बाधा होत आहे. ** हे मात्र नक्की
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल
फेसबुक पेज ला फॉलो करा
टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा
2 टिप्पण्या
हिरवी निबोली चालते का व बनविल्यानंतर किती दिवस वापरता येईल
उत्तर द्याहटवाहो सर हिरवी निंबोळी चालते.आणि वापर एक महिना करू शकतो.
हटवाजैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161