Ad Code

Responsive Advertisement

जैविक पद्धतीने ऊस पिकांचे नियोजन आणि पद्धती.🎋🎋🎋🎋🎋

 जैविक पद्धतीने ऊस पिकांचे नियोजन आणि पद्धती.🎋🎋🎋🎋🎋

        उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे  जैविक अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते.ऊस शेतीसाठी जैविक खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे.त्यात डी कंपोजर ,हिरवे निळे शेवाळ,बायोमिक्स वापर करावा.बुरशीनाशक साठी Trichoderma वापर करावा.पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप गरजेचे आहे.त्यामध्ये खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.☘️🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️

        पाहिले उसामध्ये ओलावा निर्मान करून डी कंपोजर टाकून पाचट कुजवणे.आणि जमीन पूर्णपणे भुसभुशीत करणे.नंतर नांगरणी देऊन  ढेकळे फोडून घ्यावीत.त्यानंतर एकरी २ टन चांगले बायोमिक्स प्रक्रिया केलेले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ,नंतर  वखरणी किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.नंतर आपल्याला सोप्या पद्धतीने बेड तयार करावेत.पाणी साठा उपलब्ध करावा.निवड करताना एकदा जमिनीचा प्रकार पाहून घ्यावेत.🌅🌄🌅🌄🌅

        ऊस लागवड आधी बीज प्रक्रिया करावी. नंतर पाणी व्यवस्थापन बरोबर करावेत.तसेच मग राहिलेले  शेणखत सोबत निम पेंड,सेंद्रिय खते, ताग बोरू धेंचा,हिरवळीची खते, हिरवे निळे शेवाळ लागणीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा.किंवा पूर्ण शेतात चाळणी पद्धतीने फेकून द्यावेत.फक्त जमिनीमध्ये ओलावा असणे अती आवश्यक आहे.जैविक खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते.⌛⌛⌛⌛⌛

        ऊस फुटवे वाढ होण्यासाठी बायो मिक्स सरी पद्धतीने द्यावे.पाट पाणी द्वारे द्यावे.ओलित करताना सोबत सोबत  एकरी ५००० लिटर डी कंपोजर बनवून सोडावेत.हे सलग तीन महिने करावेत.कीटक नियंत्रण साठी निम अर्क ,दशपर्णी अर्क, हिंगणास्त्र,गोमूत्र ताक हिंग, ब्रम्हास्त्र,अग्निहोत्र राख वापर करावा.🏞️🏞️🏞️🏞️🏞️

        जैविक पद्धतीने कीटक नियंत्रणसाठी ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर करा.तसेच चिकट सापळे एकरी ५० लावावेत.पक्षी थांबे लाकडी काठीवर तयार करावेत.उसाच्या पालापाचोळा पडलेला असेल तर जमिनीवर झाकावा.तसेच फुटवे जास्त वाढ होण्यासाठी तांदूळ पेज किंवा जैविक ह्युमिक वापर करावा.🌻🌻🌻🌻🌻

        वन्य प्राणी नियंत्रणसाठी झटका मशीन किंवा मिरची ऑईल टाकून ठस्का तयार करणे आणि हवेच्या दिशेने ठेवणे.तसेच आजूबाजूला तार लावणे.पीक हिरवेगार ठेवण्यासाठी गोमूत्र ताक गूळ फवारणी करणे.🧫🧫🧫

        गर भरून काढण्यासाठी पुन्हा डी कंपोजर, जैविक निविष्ठा सोडणे महत्वाचे आहे.तसेच मासोळी तैल, आवळा रसायन वापर करणे.🌿🌿🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या