जैविक पद्धतीने नियोजन फळवर्गिय पिकांचे संत्रा मोसंबी तसेच लिंबू पिकांचे.फुल कळी अवस्था निर्मिती माहिती संकलन..
फळवर्गीय पिकांना आतापासून ताण देणे सुरू करावेत.५५-६० दिवस ताण घेणे खूप गरजेचे असते.तसेच जमिनीचा सुद्धा प्रकार पाहून ताण देणे महत्वाचे ठरते.पहिल्यांदा आपल्याला झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडून टाकने,सल काढणे.त्यानंतर चुना २.५ किलो २ किलो मोरचुद ,५ लिटर गोमूत्र , घेऊन फवारणी करणे महत्वाचे आहे.तसेच आपल्याला सर्वच झाडाला चुना मोरचुद paste तयार करावेत.जिथे डींक्या दिसत असेल.तिथे लावणे गरजेचे आहे.आणि जमिनीपासून ४-५ फूट आपल्याला झाडांना चुना मोरचुद गोमूत्र यांचे मिश्रण करून झाडांना कलर लावणे. 🍊🍊🍊🍊🍊 सरासरी झाडांचे अंदाज पाहून झाडाला प्रक्रिया केलेले शेणखत देणे.तसे प्रति झाड प्रक्रिया केलेले शेणखत १२-१५ किलो टाकणे आवश्यक आहे.पण हे शेणखत झाडाला पाणी सोडणे त्या अगोदर देणे.म्हणजे जिवाणू वाढ होतील.आधीच शेणखत फेकले तर जिवाणू मरतील.सोबतच आपण निम ढेप,बोरू ताग ढेंचा ,सेंद्रिय खते सोबत वापर करू शकतो.गांडूळ खत टाकत असल्यास प्रति झाड 5 किलो टाकावे.सोबतच निम ढेप,बोरू ताग ढेंचा ,सेंद्रिय खते सोबत वापर करू शकतो.🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
झाडाला पाहिले पाणी दिले नंतर आपण जैविक शेवाळ म्हणजेच blue green algae मिक्स करून गांडूळ खत १०० किलो घेऊन एकरी फेकावेत.पाणी एकदा फळवर्ग्रीय पिकांना दिले नंतर ताण देणे महत्वाचे असते. एकदम जास्त पाणी देऊ नयेत.आणि म्हणजे जैविक पद्धतीने पिकांना नत्र पुरवठा होणार. सोबतच ३ महिने डी कंपोजर drip ने दिल्यास किंवा द्रिंचिंग् करावी.म्हणजे जिवाणू वाढ होतील.जिवाणू खते पुरवठा होतील.जिवाणू काम करतील.जीवामृत देणे खूप छान आहे कारण सर्वात जास्त गरज जीवामृत ची आहे. 🌾🌾🌱🌾🌱 दुसरी फवारणी आपण अंडा संजीवक, तरल खत, पळस फुले, वापर करावा.नाहीतर ताप्ती एनर्जी वापर नक्की करावा.सोबत एकदा मायक्रोरायझा किंवा ह्युमिक वापर करावा drip किंवा द्रींचीग करावी.जैविक पद्धतीने सुद्धा गोमूत्र गूळ पासून ह्युमिक तयार करावे.घरीच मायक्रोरायझा कुंडी पद्धतीने मका पेरणी करून तयार करावा.🌻🎋🌻🎋🌻🎋🌻🎋
कीटक नियंत्रणसाठी फुलकळी निघताच चिकट सापळे लावणे ,लाईट ट्रॅप लावणे महत्वाचे आहे.फुल कळी पूर्ण निघताच शेतात स्प्रिंकल शेतात लावले तर कीटक रोग कमी होतो.तसेच निम अर्क ,निम ऑईल,दशपर्णी अर्क, हिंगणास्त्र,तरल खत, ब्रह्मास्त्र,खट्टा रयासान,गोमूत्र - ताक, गांडूळ पाणी, बाजरी पासून बनविलेले कीटकनाशक वापर करावा.या पैकी कोणते दोन.एकदा फवारणी करण्यासाठी.
बोरॉन कॅल्शियम फॉस्फरस लोह मग्निसियम कमतरता पूर्ण करण्यासाठी फळवर्गीय पिकांना डी कंपोजर , शेवाळ खते Blue green algae.पळस फुले विरजण सडवून drip ने द्यावे.म्हणजे झाडांना लवकरच भेटणार.पळस पाणी गूळ मिक्स करून drip ने द्यावे.म्हणजे झाडांना लवकरच भेटणार.🪅🎊🎉🪅🪅🌾🪱🪱🪱🪱🪱🪱🪱🪱🪱
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल
फेसबुक पेज ला फॉलो करा
टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161