Ad Code

Responsive Advertisement

नमस्कार शेतकरी मित्रहो कधीच आपण आपल्या मित्राला विसरू नका..🪱🪱🪱

नमस्कार शेतकरी मित्रहो कधीच आपण आपल्या  मित्राला विसरू नका..🙏🏼🪱


            नैसर्गिक शेती करताना आपल्याला मदत करणार्‍या प्राणी, कृमी आणि कीटकांत सर्वात महत्त्वाचे दोन जीव आहेत. एक आहे गाय आणि दुसरे आहे गांडूळ. यातल्या गांडुळाला तर शेतकर्‍यांचा मित्र म्हटले जातेे. आपण शाळेत शिकताना,गांडुळ हा शेतकर्‍यांचा मित्र आहे, असे शिकत आलो आहोत.🪱🪱🪱🪱🪱🪱

        परीक्षेत एक मार्क मिळण्यासाठी हे उत्तर उपयोगी पडते पण, प्रत्यक्षात शेती व्यवसाय करताना गांडुळ १०० मार्का इतका महत्त्वाचा आहे. आपण मात्र आपल्या या मित्राला विसरून शेती करीत आहोत. केवळ विसरूनच नव्हे तर त्याची उपेक्षा करून शेती करायला लागलो आहोत. एकवेळ तेही ठीक आहे पण आपण जिला शेतीची आधुनिक पद्धत म्हणतो ती तर आपल्या या मित्राच्या जीवावर उठणारी आहे.🐝🪱🐝🐝🐝🐝🐝🐝🐝

        पुस्तकात आणि परीक्षेत गांडुळाला आपला मित्र म्हणायचे आणि प्रत्यक्षात शेती करताना त्याचा जीव घेणारी शेती करायची, अशी शेती यशस्वी कशी होईल ? गांडुळाला विसरून चालणार नाही. त्याची ओळख करून घ्यावी लागेल. त्याचा कसा आणि किती ङ्गायदा करून घेता येईल याचा विचार करावा लागेल. गांडुळ हा प्राणी कधी निर्माण झालाय याबाबत मतभेद आहेत पण तो माणसाच्या पूर्वी या सृष्टीत अवतरला आहे असे मानले जाते. त्याची काही वैशिष्ट्ये आहेत.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

        जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा, अमरावती . ९५२९६००१६१. जैविक शेती तसेच नैसर्गिक शेती विषयक संपूर्ण पीक माहिती ,नियोजन आणि व्यवस्थापन दिले जातील..♒♒♒♒

        गांडूळ हा एकलिंगी प्राणी आहे. म्हणजे एकाच गांडुळाचा निम्मा भाग नर असतो तर निम्मा भाग मादीचा असतो. त्यामुळे प्रत्येक गांडुळ अंडी घालत असतो आणि त्याची पैदासही मोठी असते. गांडुळ हा दवणे, वाळे, गेचवे, शिंदाडे, काडू इत्यादी नावांनी ओळखला जातो. जगभरामध्ये गांडुळाच्या ३ हजार जाती असून त्यातल्या ३०० जाती भारतामध्ये आहेत. गांडुळाची लांबी एक इंचापासून अगदी ८ ते १० इंचापर्यंत असते. गांडुळाचा जीवनक्रम, त्याच्या सवयी, त्याचे शरीर आणि त्याच्या पोटातली भट्टी या सर्वांचा अभ्यास केला असता या सर्व बाबी शेतीसाठी अतिशय उपकारक असल्याचे आढळले आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

        गांडुळ जन्मभर शेतकर्‍यांसाठी काम करत असतो. तसे माणूसही काम करतो परंतु माणूस आठ तास ड्युटी करतो. गांडुळ मात्र चोवीस तास ड्युटी करत असतो.विशेष म्हणजे त्या बदल्यात तो कसलाही पगार मागत नाही. करोडो रुपयांची गुंतवणूक करून एखादा कारखाना उभा केल्यानंतर त्यातून जेवढे रासायनिक खत तयार होईल त्यापेक्षा किती तरी जास्त आणि किती तरी उपयुक्त खत गांडुळ आपोआप निर्माण करत असतो.🌾🌱🌾🌱🌾🌱🌾🌱          


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.



टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161