कामगंध सापळा(funnel trap) हा कामगंध सापळा पिकांवरील पतंग कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. यास इंग्रजीत 'फेरोमन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात.
हा ट्रॅप एकदम कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे.हा नरसाळ्याच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो.त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते.वरची बाजू एका झाकणाने झाकली असते.त्यास आतील बाजूस 'आमिष' ल्युर लावण्याची सोय असते.त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येत असते.त्याला आपण कामगंध ल्युर मन्हतो.
नर कीटक हा मादीच्या मिलनासाठी त्या वासाने या सापळ्याकडे आकर्षित होतो,फनेलमध्ये येतो, घसरून खाली पिशवित पडतो व काही दिवसांनी मरतो.किंवा आपण मारून टाकावेत.त्यांचे मिलन होत नाही,अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. याद्वारे किडींच्या उत्पादनाचे नियंत्रण बंद होते.
◾कापसातील तसेच सोयाबीन , तूर, मका,हरभरा पिकातील पतंग नियंत्रण करण्यासाठी असे करा व्यवस्थापन :-
पतंग नियंत्रण करण्यासाठी प्रती एकर 8-10 कामगंध सापळे गोळी सह लावावे. कीटकाच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनाचा सूक्ष्म गंध वातावरणात पसरतो . त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधताना कीटकाची फसगत होते. परिणामी त्यांचे मीलन न झाल्यामुळे प्रजोत्पादन होत नाही, त्यामुळे वाढणाऱ्या कीटकाच्या संख्येत घट होते.
हे कामगंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1 ते 1.5 फूट उंची ठेवून वापरावे. तसेच या सापळ्यातील संबंधित पिकावरील संबंधित किडी करिता वापरली जाणारी काम गंध गोळी साधारणपणे 30 दिवसानंतर नक्की बदल करावी.
◾अती महत्वाची सूचना :-
▪️कामगंध सापळा वाऱ्याने पडण्याजोगा नसावा.
▪️आमिष( ल्युर ) लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे,हातास कोणताही उग्र वास असू नये.
▪️पाऊस आल्यास त्यातील आत गेलेले पाणी काढून टाकावे.पावसा मध्ये नक्की लक्ष द्यावेत.
▪️पाळीव जनावरांपासून याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.दिवसातून एकदा तरी पाहणी करावी.पक्षी थांबे यावरच तयार होतात.
▪️हा सापळा,ज्या किडीचे पतंग असतात, त्यासाठी परिणामकारक आहे.
▪️वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळेपिकानुसार ल्युर ठरते.
◾पिकानुसार ठरते कामगंध :-
▪️सध्या बाजारात तूर व हरभरा पिकावरील घाटेअळी, सोयाबीन वरील स्पोडोप्टेरा अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड अळी इत्यादीची कामगंध सापळे बाजारात उपलब्ध आहेत. एकदम होलसेल दरात विक्री सुरू झाली आहे.आमच्या कडे बुकिंग सुरू आहे. कामगंध सापळा तसेच ल्युर उपलब्ध आहेत.होलसेल दरात शेतकरी मित्रांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध आहेत.मग आजच संपर्क करा.9529600161
▪️कामगंध सापळ्यांचा वापर योग्यवेळी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात केल्यास किडीवर खूप जास्त प्रमाणात नियंत्रण मिळवता येते.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161