Ad Code

Responsive Advertisement

सेंद्रीय खतांचे शेतीमध्ये फायदे 🪱🍁🌿

सेंद्रीय खतांचे फायदे 🪱🍁🌿🌱🍂🥀🐜🦅🦆🐝🦋


    • जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

    • सेंद्रीय खतांमध्ये जमीन, पाणी व पिके यांसाठी अपायकारक अशी रसायने नसतात त्यामुळे उपयुक्त जीवजंतू व मित्र किडींना कसलाही अपाय होत नाही.

    • सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते व जमिनीचा पोत सुधारतो व नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

    • पिकाच्या उत्पादनात १५ ते ३० टक्के वाढ होते.

    • जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रति जैविकांमुळे पिकाची रोग व कीड़ प्रतिकारशक्ती वाढते.

    • जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या संजीवकांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते व पिकाची वाढ चांगली होते.

    • जैविक खते तुलनेने स्वस्त असतात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.

    • नत्र स्थिर करणारी जैविक खते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. प्रती हेक्टरी २५ ते ३oo किलोपर्यंत नत्र उपलब्ध केले जाते.  🙏👍🏻🙏

         रासायनिक खतांद्वारे एवढे नत्र उपलब्ध करण्यासाठी १ ते १२ गोष्णी युरिया वापरावा लागेल.काही रासायनिक खते पुर्णत: पिकांना उपलब्ध होत नाहीत. जसे की, स्फुरदयुक्त रासायनिक खतांच्या उपलब्धतेचे प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे. उर्वरित ८५ ते ८० टक्के स्फुरद जैविक खतांच्या वापराने उपलब्ध होऊ शकते. 🪱🐝🦆🦅🐜🦋🍂🥀🍁🌿

        महाराष्ट्रातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याच्या प्रमुख कारणांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे एक आहे. झिंक विरघळविणारी जैविक खते जमिनीतील खनिज स्वरूपातील झिंक विरघळवून पिकांना उपलब्ध करतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

🟠🔴🟢🔵    

        जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी 

• जैविक खते शिफारस केलेल्या पिकांसाठीच वापरावीत. तसेच बाटलीवर दिलेल्या अंतिम दिनांकापूर्वी वापरावीत.

• बुरशीनाशके, कीटकनाशके यांची बीजप्रक्रिया करावयाची असल्यास जैविक खत सावलीत, थंड जागी व थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.

• रायझोबियम जैविक खत पिकाचा गट पाहूनच खरेदी करावे व वापरावे.👍🏻🙏👍🏻🙏

कोडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व रासायनिक खते यांच्यासोबत ती मिसळू नयेत. जिवाणू खते जिवंत राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा व सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे.

जैविक खतांची नावे व घटक खालीलप्रमाणे आहेत

महारायझो - रायझोबियम

महाअझेटो - अड्रोटोबॅक्टर

महाअझोस्पी - अझोस्पीरीलम

महाअसिटो - असिटोबॅक्टर

महापीएसबी - स्फुरद विरघळविणारे जिवाणू

महाकेएमबी - पालाश उपलब्ध करणारे जिवाणू

महाझेडएसबी – झिंक विरघळविणारे जिवाणू

 महाव्हॅम - मायकोरायझा

महाएनपीके (घनरूप) - घनरूप जैविक संघ

महाएनपीके (द्रवरूप) - द्रवरूप


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या