Ad Code

Responsive Advertisement

देशी बियाणे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे.त्यासाठी देशी बियाणे लागवड करणे तसेच सवर्धन करणे खूप महत्वाचे.

"देशी बियाणे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे."

           कारण देशी बियाणे आता पूर्णपणे गायब होताना दिसत आहे त्यामुळे आजार सर्वत्र पसरत आहे. देशी बियांचे चे खास एक वैशिष्टय म्हणजे पुन्हा पुन्हा निघणे ,पोषक वातावरण तयार करून जमिनी मधून निघणे.जिथे बीज पडले तिथे पोषक वातावरण मिळाले की निघणे.
संकरित बियाणे आज मार्केट मध्ये असल्याने त्या बियाण्याची उगवण क्षमता खूप कमी असते.तसेच सर्वात जास्त रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेले बियाणे असल्याने आजार पसरविण्याचा धोका सुद्धा जास्त असतो.त्यामुळे प्रत्येक घरात संधिवात,लकवा,शुगर,कॅन्सर,रक्तदाब,डोकं दुखणे,चिडचिड होणे,अन्न पचन न होणे, हार्ट अटक, अँसिडीटी सारखे आजार पसरले आहे.त्यामुळे जी एम बियाण्याचा वापर थांबविणे खूप गरजेचे आहे.  
देशी बियाणे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झाले आहे.लागल्यास संपर्क करा.9529600161.
रानभाजी अंबाडी :-
व्हिटॅमिन, फायबर्स अंबाडी भाजी मध्ये असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो.या भाजीत व्हिटॅमिन-A, आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते.तसेच या भाजीची भाकरी सुद्धा बनविली जातात.पावसाळा मध्ये या भाजीला खूप महत्व असल्याने या भाजीला रानभाजी म्हणतात.
रानभाजी घोळ :- 
घोळ भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात. लो कॅलरीज असणाऱ्या या भाजीत फॅटचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण 0% असते. घोळची भाजी ही एक रानभाजी असून ती बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते.घोळची भाजी अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्यही सुधारते.तसेच पालकभाजी म्हणून सुद्धा वापर जेवणामध्ये केला जातो.उन्हाळा मध्ये सर्वात जास्त उपयोग केला जातो.
रानभाजी आंबट चुका :- 
ह्रदयाचे आजार, उचकी, दमा, अपचन, मूळव्याध, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर चुका उपयुक्त ठरतो.या वनस्पतीस लोह विरघवळणारी तसेच मांसपाचक म्हणून शीघ्र काम करणारी वनस्पती म्हणून ओळखले जाते.शरीरावर सूज आली असेल तर चुक्याची पाने वाटून त्याचा लेप तयार करून सूज आलेल्या जागेवर लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.विंचू, गांधीलमाशी अश्या विषारी प्राण्यांच्या दंशावर चुक्याचा वापर करतात.डोके दुखत असेल तर त्यावर चुका व कांद्याचा रस चोळावा.चुका वातदोष कमी करण्यास मदत करते.चुक्याच्या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते.भाजी आंबट-गोड असून, वातदोष कमी करते.पचनास हलकी असून, जेवणास चव आणणारी आहे. भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जेवण जात नसल्यास चुक्याच्या भाजीमुळे भूक लागते, जेवण जाते आणि पचनक्रियाही सुरळीत होते. ही भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह,आदी उष्णतेच्या विकारात भाजीचा उपयोग होतो.पालक सारखी भाही बनविली जातात.
देशी वाल :- 
वाल हे रूक्ष, उष्ण गुणाचे आहे.त्यामुळे हिवाळा मध्ये जास्त सेवन केले जातात. ते तुरट-गोड चविचे असून पचण्यास जड आहे.यामध्ये भरपूर पोषणतत्वे असून त्यात कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, लोह, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. जर तुमच्या शरीरावर जखम झाली असल्यास वाल भाजी दररोज खावी, यामुळे जखम भरून निघते. तसेच कॅल्शिअमची, ब आणि क जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी देखील गुणकारी आहे.
देशी कोहळ आणि काशीफळ :-
कोहाळ मध्ये पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असल्याने कोहळ खाणे हृदयासाठी खूप फायद्याचे आहे. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. आम्लपित्ताचा त्रास कोहळ खाल्याने कमी होतो. यातील फायबर्समुळे पोट साफ होते,तसेच त्यामुळे कृमी नष्ट होण्यास मदत होते.मूळव्याध कमी होण्यास मदत होते.कोहळ चा उपयोग सर्वात जास्त भाजी,पकोडे , भजी, खीर बनविण्यासाठी होतो.यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए (211 मिग्रॅ), व्हिटॅमिन सी (20.9 मिग्रॅ) आणि पोटॅशियम (319 मिग्रॅ) आणि फॉस्फरस (52 मिग्रॅ) आढळतात.ह्या फळात प्रति 100 ग्रॅम आढळते. एवढेच नाही तर या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात.

हादग्याची (हेटा) फुलं :- 
हादगा पित्त, वात व कफनाशक असून पौष्टीक व शक्तीवर्धक आहे. हादग्याच्या पानांमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. हादग्याच्या फुलांची व शेंगाची भाजी करतात जी नेत्रविकारावर तसेच शरिरस्वास्थासाठी गुणकारी ठरते. हादगा ही वनस्पती सर्दी, डोकेदुखी, नेत्रविकार, मिरगी, वायुविकार, पोटदुखी, त्वचाविकार आदींवर गुणकारी ठरते. हादग्याची झाडे शेताच्या बांधावर सरळ रेषेत लावल्यास शेतातील पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्याचे काम ही झाडे करतात म्हणून त्यांना wind binder असेही म्हणतात.
तुळस :- 
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे. ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते. तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळविण्यासाठी रोज तुळस ची पाने आणि एक ग्लास सोबत प्यावे.
कोथिंबीर (धनिया, संभार) :- 
कोथिंबीरमध्ये अनेक गुण लपले आहेत.यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, आयर्न, थियामीन, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीनदेखील असतं.त्वचेसंबंधित असणाऱ्या काही समस्या ज्याप्रमाणे पिंपल्स, कोरडी त्वचा, टॅनिंग यासाठी कोथिंबीरचा खूपच चांगला फायदा होतो.वास्तविक कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण असतात जे तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहेत. यामध्ये विटामिन सी असून तुमच्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते आणि एजिंगची लक्षणं दिसत असल्यास, यावर रोख लावण्यासही कोथिंबीरीची मदत होते. याशिवाय फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांवरही कोथिंंबीर हा चांगला उपाय आहे.
दोडका :-
अरूची, खोकला, कफ, कृमी व ताप या विकारात दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. दुबळ्या व्यक्तींना वजन वाढवण्यासाठी दोडका खूप उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मुतखडा पाडण्यासाठी होतो. दोडका ही भाजी पचायला हलकी असते आणि पथ्याची समजली जाते.दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत. दोडका आणि दोडक्याच्या वेलीचा, व बियांचा निरनिराळ्या आजारांमध्ये उपचार म्हणून उपयोग केला जातो.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या