मायकोरायझा म्हणजे काय जाणून घेऊयात फायदे आणि महत्व.
मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी,आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असे आपण म्हणु शकतो. पिकाच्या मुळांवर वाढुन हि बुरशी एक प्रकारे मुळांचा विस्तार वाढवत असते, ज्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये ग्रहण होते.
ग्लोमेरोमायकोटा गटातील ग्लोमस, गिगास्पोरा, अक्युलोस्पोरा, एन्ट्रोफोस्पोरा, स्लेरोसिस्ट आणि स्कटेलोस्पोरा ह्या वर्गातील बुरशी उन्नत पिकांच्या मुळांच्या आत काही अंतरापर्यंत वाढून पिकाकडुन शर्करा आणि अन्नरस मिळवतात, आणि त्या बदल्यात पिकांस प्रामुख्याने अन्नद्रव्यांची उपलब्धता करुन देत असतात. ह्या वर्गातील बुरशींना व्हॅस्क्युलर अर्ब्युस्कुलर मायकोरायझा म्हणजेच व्हॅम असे देखिल म्हणतात. ह्या बुरशी पिकांच्या मुळांच्या वर वाढतात. पिकाच्या मुळांत असलेल्या पेशींच्या आत ह्या बुरशी शिरत नाहीत तर पेशी भित्तिकेच्या आत वाढतात. त्या ठिकाणी ह्या बुरशी काहीशा फुग्याच्या आकाराची वाढ करतात तर काही वेळेस अनेक फांद्या उप फांद्या असल्या सारखी वाढ करतात. मुळांच्या पेशी भित्तिकेत अशा प्रकारे वाढल्यामुळे पेशीतील अन्नरस आणि बुरशीद्वारे जमिनीतुन शोषुन घेतलेला रस, स्फुरद,
सुक्ष्म अन्नद्रव्य यांची देवाणघेवाण सहज करणे शक्य होते.बुरशी आणि मुळांच्या अशा एकत्र वाढल्याने, मुळांना जमिनीतील अन्नद्रव्ये प्रामुख्याने फॉस्फोरस चा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो. शिवाय पिकाच्या पांढऱ्या मुळांपेक्षा देखिल जास्त मोठ्या अशा पृष्ठभागामुळे (Surface area) मायकोरायझा ची
बुरशी जास्त प्रमाणात अन्नद्रव्य शोषुन घेवु शकते.
पिकाच्या मुळांद्वारा घेतल्या जाणाऱ्या स्ट्रिगोलॅक्टोन्स मुळे मायकोरायझा च्या बुरशीचे स्पोअर्स रुजण्यास मदत मिळते.जर जमिनीत स्फुरद ची मात्रा कमी प्रमाणात असेल तर मायकोरायझा बुरशीची वाढ आणि तिला येणाऱ्या फांद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जमिनीत जास्त प्रमाणात स्फुरद (फॉस्फोरस) असल्यास ह्या बुरशीची वाढ थांबते. ह्या मुळेच मायकोरायझा चा वापर आणि त्यापासुन मिळणारे फायदे ह्यावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा येतात. जमिनीत ३० ppm इतका फॉस्फोरस असल्यानंतर मायकोरायझा ची वाढ काही प्रमाणात कमी होते, तर ३०० ppm पेक्षा जास्त प्रमाणात फॉस्फोरस असल्यानंतर हि वाढ पुर्णपणे थांबुन जाते.
मायकोरायझा बद्दल माहीती
मायकोरायझा एक उपयुक्त बुरशी आहे जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांना प्रवेश करते. हे बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती, ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके सोयाबीन, कापुस,ऊस,केळी,पपई हळद,वैगरे आहेत, त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते. झाडे आणि माती मा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहेत.मायकोरायझा मुळे प्रणालीची वसाहत करते, तंतूंचा एक विशाल नेटवर्क तयार करते. हे बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज व पोषक द्रव्ये आणी अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते. अतिरिक्त पाणी आणि पोषक द्रव्य वनस्पतींना पुरवून,मायकोरायझा हे वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान करते. या बुरशी मुळे आपन चांगल्या नैसर्गिक जीवनसत्त्व आसलेले पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पीकवु शकतो.
जैविक बुरशी वापर केल्याने होणारे शेतात फायदे.
1)झाडाची चांगली आणि अधिक संतुलित वाढ होते.
2)मातीतील सुक्ष्मद्रव्ये. फाॕस्फरस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.
3) फुलं आणि फळ धारणा अधिक मिळते.
4) हानीकारक बुरशीची वाढ होउ देत नाही.
5) झाड काटक बनते प्रतीकुल हवामानात तग धरुन वाढते.
6)पपई मिरची सारख्या पिकाला मर रोग येत नाही.
7)पिकाची वाढ झपाट्यात होते.
8)उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
मायकोरायझा विक्री सुरू आहे.शेतकरी मित्रांना लागल्यास नक्की संपर्क करा.घरपोच सुद्धा पाठविणे सुरू आहे.9529600161.जैविक शेती मित्र निखिल तेटू.NPOP मान्यता प्राप्त मायकोरायझा विक्री सुरू आहेत.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
2 टिप्पण्या
Innovative and excellent information for the form in the helpful and beneficial for the former🙏🙏🙏so thank to you sir🙏🙏
उत्तर द्याहटवाThanks sir ji..
हटवाजैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161