Ad Code

Responsive Advertisement

शेतकरी मित्रहो जैविक शेती काय आहे ? समजून घ्या.शेतीवरील होणारा महागडा खर्च कमी करा.उत्पन्न विषमुक्त बनवा.सवतःला होणारे आजार कमी करा.

शेतकरी मित्रहो जैविक शेती काय आहे ? समजून घ्या.शेतीवरील होणारा महागडा  खर्च कमी करा.उत्पन्न विषमुक्त बनवा.सवतःला होणारे आजार कमी करा.👍🏻👍🏻🌾🌱🌿☘️🍀🍃🎋🙏🏼👍🏻🙏🏼


            मी नेमके जानेवारी महिन्यात  रासायनिक खते, बोगस खते चा व्हिडिओ बनविला होता.ते बोगस खते नसून सिमेंट वाळू चे खडे होते.हे सुद्धा सिद्ध केले.तसेच quality control मध्ये सुद्धा sample पाठविले होते.त्यांनी सुद्धा सिद्ध केले की ,हे वाळू मिश्रित खडे आहे. ते 1 वर्ष पण विरघळणार  नाही आहे.पण काही कारस्थानी लोकांनी ,🦚🦨 मार्केटिंग लोकांनी ह्या व्हिडिओ मधील सत्य दिसत असताना सुद्धा असत्य असे दाखविले. कारण या लोकांचा धंदा बंद होत होता त्यामुळे हे सर्व प्रकरण बंद करण्यात आले होते.पण मी बनविला तो व्हिडिओ सत्य होता. तसेच त्याचे आज सुद्धा प्रकरण शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत.
           त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्ष पूर्वक शेती उद्योग सत्य स्वरूप पाहून करायला पाहिजे.🦩🕊️🦜
              रासायनिक खतांचा भाव हा वाढणारच.साठवणूक कमी होणारच.भेसळ सर्वात जास्त होणारच. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोज होणारच. त्यासाठी सर्व माझ्या शेतकरी मित्रांनी शेतावर जैविक निविष्ठा बनवा.कारण शेतकरी हाच तज्ञ आहे.शेतकरी हाच agriculture Engineer आहे. त्यामुळे सर्वात जास्त🐢🐍 प्रक्रिया केलेले शेणखत, गांडूळ खत , हिरवळीचे खते,Pro VAM व गांडूळ पाणी यांचा वापर करा.कंपोस्ट खत, सोनखत, एरंडी पेंड,निम पेंड,करडई पेंड,मासोळी खत,हाडांचा चुरा,रॉक फॉस्फेट (राख) यांचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर करा.बोरू धेंचा ताग शेतात पेरणी करून फुल अवस्था मध्ये🐰🐭 कापणी करा व ते जमिनी मध्ये गाळा.त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो.
            ते आच्छादन म्हणून सुद्धा वापर करा.  https://www.facebook.com/nikhil1mitr/

            तसेच जीवामृत, पंचगव्य, जैविक ह्यूमिक ,तांदूळ पेज,बेल रसायन, आवळा रसायन, जिवाणूपाणी कल्चर, फळांचा सडवा,GA, जिवाणू🍃🎋🌱 वाढविणे,पळसाची फुले, जैविक पोटॅश, तरल खत, राख, गारबेज enzymes, नारळ पाणी ऊस रस व गूळ फवारणी करा. वापर करा. निम अर्क, दशपर्णी अर्क, तरल खत, लमीत, अंडा संजीवक,बाजरी कीटकनाशक, हिंगनास्त्र,अग्निहोत्र राख,करंज तेल, कीटकनाशक,🦋🪱🐝 ब्रह्मास्त्र,महाअस्त्र, CVR यांचा कीटकनाशक साठी वापर करा.


         दही तांबे धातू, अग्निहोत्र राख,गोमूत्र ताक गूळ, ताक तांबे धातू बुरशीनाशक म्हणून वापर करा.



            मासोळी तैल बनवा.जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण साठी प्रकाश सापळे लावणे,लाईट ट्रॅप बांधावर लावणे,पक्षी थांबे,पिवळे निळे🦇🦋 चिकट सापळे,मिश्रपीक पद्धती, ऑईल लावून साडी फिरविणे हे अनुभवी प्रयोग करून पहा.मित्र कीड संगोपनसाठी ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर 🦉🦅 करा.पक्ष्यांना सहज अन्न पाणी उपलब्ध करून द्या.मधमाशी यांना पाणी फुले जवळपास उपलब्ध करून द्या..  शेतात कोणतेही बाजारातील महागडी  रसायने कोणतेही वापर करून नका..
हे सर्व पद्धती जर जैविक शेती मध्ये वापर केला तर पिकावर येणारे रोग फार कमी येतील.आणि खर्च सुद्धा कमी राहील. शेतकरी सुद्धा नवनवीन प्रयोग करायला तज्ञ बनेल.👍🏻🙏🏼👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🙏🙏

            मित्रानो रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवा,आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवा,त्याशिवाय तरणोपाय नाही.


            शेतकरी बंधुनो आज ग्रुप वर टाकलेली केळी पिकाची CMV (ककुंबर मोझॅक व्हायरस/हरण्या) ची बातमी वाचा ,हि बातमी मागच्या वर्षाची आहे, बातमीची सेंट्रल आयडिया आहे ,रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे CMV चा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे जमीन निर्जीव झाली,जमिनीतील सजीव श्रुष्टी 10 ते 20 पटीने कमी झाल्यामुळेच जमिनीची उत्पादकता कमी झाली,आणि त्यामुळेच पीक विविध रोगांना बळी पडू लागली. 
  

            जमिनिची उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू वाढ या शिवाय आपल्या जवळ दुसरा कोणताच मार्ग नाही, त्यामुळे आपले कोणतेही पीक प्रतिकार क्षम होईल व रोग कमी पडतील.
        रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळेच आजची आपली शेती आपल्याला परवडत नाही.शेती हे शास्त्र आहे, पारंपरिक पद्धतीने केली तर लावलेला खर्चही वसूल होणार नाही ,त्यासाठी सुशिक्षित,नवयुवक शेतकऱ्यांनी शास्त्र शुद्ध पद्धतीनेच शेती केली पाहिजे, पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता संपले आहेत,शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाराच आता या क्षेत्रात टिकाव धरेल ,त्यासाठी शेती व्यवसायात आता सल्ला आणि मार्गदर्शकाची आवस्यकता भासू लागली आहे.
       


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161