Ad Code

Responsive Advertisement

शेतकरी मित्रहो आपल्याला फसविनारे,लुटणारे खूप भेटतील.कृपया यांच्या नादी लागू नका.👍🏼🌱🌾🌿

 शेतकरी मित्रहो आपल्याला फसविनारे,लुटणारे खूप भेटतील.कृपया यांच्या नादी लागू नका.फक्त जैविक शेती जोपासा.घरी एक गावरान गाय पालन करा.👍🏼🌱🌾🌿

        शेतकरी मित्रहो येणाऱ्या काळ खूप समस्यांचा आहे.कारण आपण शेतकरी आहे आपल्याला कोणीच मदत करणार नाही आहे. रक्ताच पाणी तर होतच आहे पण रक्त कधी शरीर मधून निघून जाते वाट पाहणे सुरू आहे.✔️✔️✔️✔️

        नवीन कृषी कायदे, आंदोलने,मोर्चे ,संप हे फक्त नावाने शेतकरी मदतीचे.पण राजकारण हिताचे.राजकारणी फायद्याचे.यांचं सर्व मह्त्व विरोधी राजकारणी नेते,मंत्री,कार्यकर्ते यांना.कारण आपला फक्त वापर सुरू आहे.यावर कोणीच बोलायला तयार नाहीत.👍🏼👍🏼👍🏼


        आज महाराष्ट्र मध्ये नाहीतर संपूर्ण भारत देशात शेतकऱ्यांना लुटण्यासाठी हजारो कंपन्या तयार आहे.तसेच प्रत्येक महिन्याला १० कंपनी तयार होत आहे.फक्त शेतकरी मित्रांना लुटण्यासाठी. फसविण्यासाठी. सेंद्रिय कंपन्या तयार केल्या पण सेंद्रिय बाजारपेठ अजून काहीच पत्ता नाहीत.⛅

        त्यासाठी जैविक शेती कडे माझ्या शेतकरी मित्रानो लक्ष द्या.सोडा ते रासायनिक फवारणी.सोडा रासायनिक खते. स्वतः आपली जमीन खराब करू नका.कारण रासायनिक मध्ये सुरुवात पासूनच सर्व भेसळच चालू आहे.त्यामुळे रिझल्ट कमी आणि जमिनी खराब होत आहे.आणि १ एकर साठी आजचे रासायनिक फवारणी आणि खते खर्च २५-३० हजारचे होत आहे.*🌱

        त्यासाठी काही प्रमाणत जैविक खते औषधे घरीच बनवा.तर काही कृषी विज्ञान केंद्र मधून आना.तर काही नामांकित असलेले सरकार मान्य कडून आना.नेहमी अशीच वाटचाल सुरू असली तर आपल्याला जास्त समस्या येणार नाही.पिके रोगमुक्त राहणार.खर्च वाढ - बचत सुरूच राहणार..☘️☘️

        यावर्षी मी तिवसा भागातील १ एकर सोयाबीन वर सुरुवातीपासूनच प्रकिया केली पूर्ण जैविक पद्धतीने.गांडूळ खत.गांडूळ पाणी.नंतर फवारणी निम अर्क,दशपर्णी अर्क,तरल खत,गोमूत्र,ताक,हिंग,दारू,तुरटी,मिठ,अंडा संजीवक,बेलव रसायन, ताप्ती एनर्जी, तांदूळ पाणी.4 फवारणी खर्च ६०००/- रुपये.तसेच गांडूळ खत.गांडूळ पाणी शेतकरी कडे उपलब्ध होते..💐💐💐

        त्या शेतकऱ्याला एकूण उत्पन्न १ एकर मध्ये ७ क्विंटल झाले.तो आज आनंदी आहेत.सोयाबीन पण उत्तम स्वरूपात टपोर झाले.खर्च सुद्धा कमी.बुरशी प्रमाण सुद्धा कमी आहे.🪱🪱🪱🪱

        शेतकरी मित्रहो येणारा काळ खूप कठीण आहेत आपल्या साठी.आपले मज्जा उडविणारे व्यापारी,सरकार,पहिला वर्ग, दुसरा वर्ग हेच आहे.आपल्या कृषीप्रधान देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकाळ,शेती विषयक कायदे येणार की नाही याची सुद्धा कोणालाही कल्पना नाहीत.फक्त आपल्याला लुटला जात आहे नेहमी.🐝

        आज आपण एक होवून एकीचे सामर्थ्य,एक स्वघोषणा जैविक शेती, याकडे  जर वाटचाल केली नाहीतर पुढच्या पिढीसाठी शेती तर नाही मिळणार.पण खायला आणि जगायला अन्न आणि पैसा सुद्धा शिल्लक राहणार नाहीत.🦋🦋🦋

        आताची तरुण पिढी आयपीएल मध्ये दंग.राजकारण,कार्यकर्ते मध्ये दंग.डिझाईन,फॅशन ,मोबाईल, लव्ह मध्ये दंग.आणि आपण शेती मध्ये दंग... एकदा विचार करा.नक्की आवडल्यास सर्वच ग्रूपवर शेअर करा..🕊️🕊️


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या