Ad Code

Responsive Advertisement

हरभरा पीक नियोजन, व्यवस्थापन माहिती🌴🌿🌾🌱🌿

हरभरा पीक नियोजन, व्यवस्थापन माहिती आणि कमी खर्चात उत्पन्न वाढ पिकांची सूत्र
🌿🌱🎋☘️🍀🍃🌿🌱🌱🌱🌱🌱


 

        सुरवातीला जमिनीमध्ये नांगरणी, वखरणी करणे खुपचं गरजेचे आहे.तसेच जमिनीला 15 दिवस तरी कडक उन्ह लागणे खूप अती महत्वाचे आहे.नंतरच मशागत कालावधी खूप महत्वाचा आहे.✔️✔️✔️

       जमिनीवर एकरी 10 किलो चुना आणि 2 ठीमेट फेकणे गरजेचे आहे. नंतर 2 दिवसांनी प्रक्रिया केलेले शेणखत म्हणजे मेटारायझम, डी-कंपोजर, जैविक बुरशीनाशक ,S-9 कल्चर, Trichoderma यांचा वापर करून बनविलेले शेणखत एकरी 2 टन टाकणे आवश्यक आहे.☘️☘️☘️☘️

        बीजप्रक्रियासाठी रायझोबियम,psb,ksb, Trichoderma, 25 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास लावावेत.सावलीमध्ये नंतर 3 तास सुकू देणे.नंतर पेरणी करणे.जमिनीचा प्रकार पाहूनच हरभरा वान निवड करा.काळी ,चुनखडी,रेताड,पिवळसर जमिनीमध्ये अलग अलग वान निवड करावेत.नंतर तुषार सिंचन ने जमिनीमध्ये ओल गेली पाहिजेत असं करून 4 इंच पर्यंत ओल जाणार अस स्प्रिंकल शिप देणे खूप गरजेचे आहे.नंतर पेरणी करावी.पेरणी करताना शक्य असल्यास मोकळी पद्धतीने पेरणी करावी.जास्त खोलवर चना पेरणी करू नयेत**.🍀🍀

        पेरणी केल्यानंतर सुद्धा एकदा स्प्रिंकल ने पाणी देणे खूप गरजेचे असते.नंतर तण नियंत्रणसाठी डवरणी करणे महत्वाचे आहेत.नंतर पाहिले फावरनी पीक वाढसाठी करणे महत्वाचे आहे.ताप्ती एनर्जी, बायो मिक्स ,अंडा संजीवक,निम ऑईल,तरल खत, गोकृपा अमृत,गोमूत्र, मासोळी तैल.


        नंतर पक्षी थांबे तयार करणे.पांढरी माशी , तुडतुडे, फुलकिडे, नियत्रंण साठी पक्षी थांबे वर पिवळे निळे चिकट सापळे, लाईट ट्रॅप लावणे खूप खूप गरजेचे आहे.पिकांची वाढ झाल्यावर एक फवारणी बुरशीनाशक घेणे खूप जिकरीचे काम आहे.नंतर जमिनीमध्ये ओल पाहूनच स्प्रिंकल ने पाणी देणे.कारण हरभरा पिकांना जास्त गरज पाण्याची नसून अन्नाची आहेत.कारण फुले जेव्हा सुरू होतात तेव्हा पाणी देणे नाहीतर काही दिवस तळन खूप योग्य राहते.नंतर पिकाना फुले सुरू होताच मायक्रो न्यूट्रीयड ची फवारणी 8 दिवस अंतर ठेवून 2 फवारणी करणे.🌻🌻🌻🌻

        जैविक शेती करूया.शेती उत्पन्न कमी करूया. विषमुक्त अन्न आणि चना डाळ बनून विक्री करूया.🌱🌿🍃🍀☘️🌱


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या